Table of Contents
आता गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला तुमच्या खिशाला चाट लावायची गरज नाही. जार ॲपने डिजिटल गोल्डमधली गुंतवणूक अगदी सोपी केली आहे. या गुंतवणूकीमुळे पैसे वाढण्यास हातभार लागेल.
आता प्रत्येकजण पैसे वाचवू शकतो.
पैशांची बचत करायला धडपडत आहात? सगळ्यांनीच हा अनुभव कधी ना कधी घेतलेला असतो!
तुम्हीही आमच्यासारखेच असाल तर तुम्ही कधीतरी तुमचे सर्व पैसे ऑनलाइन उडवून टाकायला बळी पडला असाल. त्यातून किती वेळा आपण अडचणीत येतो हे आम्हाला चांगलं माहिती आहे.
पैशांची बचत तर आपल्या सगळ्यांनाच करायची असते. पण नेमका आराखडा आणि चांगल्या आर्थिक सवयींच्या अभावी आपल्यापैकी अनेक मातब्बर मंडळीही यात अयशस्वी होतात.
आपल्या लक्षात येण्यापूर्वीच महिना संपायला येतो आणि तुमच्या मग लक्षात येते की, अरे देवा! महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या बचतीचा गाडा जिथे अडला होता तो महिन्याच्या शेवटीही तिथेच अडलेला आहे.
आकडेवारी पहिली तर लक्षात येईल की सर्वसाधारण भारतीय २१ व्या वर्षी कमावायला सुरूवात करतात पण बचतीची सुरुवात करायला मात्र त्यांना वयाची तिशी उजाडते. डोकं चक्रावून गेलं ना? हे तब्बल १० वर्षांचं अंतर आहे.
जार ॲपद्वारे ऑटोमेटेड दैनिक बचत
आता आम्ही तुम्हाला जर अशा एका ॲपविषयी सांगितलं जे तुम्हाला या सापळ्यातून सुटायला मदत करेल आणि पैशांच्या बचतीमधलं हे खिंडार भरून काढायचा अतिशय उत्तम मार्ग तुम्हाला देईल, तर?
जार नावाचं हे ॲप पैशांची बचत करण्याचा साधा सोपा मार्ग तुम्हाला दाखवेल. काय तर मग, हवी आहे का आणखीन माहिती?
तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे – खर्च. खरं सांगतोय बरं का आम्ही! एसएमएसद्वारे जार तुम्ही खर्च करत असलेल्या पैशांचा मागोवा घेते आणि ती रक्कम जवळच्या दशकापर्यंत राऊंड अप करते.
उदाहरणार्थ, समजा तुम्ही मिन्त्रावरुन आत्ताच ४९५ रुपयांना एक साधासा टॉप घेतला; तर जार ते राऊंड अप करेल ५०० ला आणि त्यातल्या फरकाची रक्कम (५००-४९५) तुमच्या वतीने गुंतवेल! आहे ना भन्नाट ?
त्यामुळे तुम्हाला बचतीची सवय लागून जाते, बचत करणं ही काही बोजड जबाबदारी राहत नाही. हे किती चांगलं आहे ना?
अगदी आपल्या लहानपणी आपण आपल्या पिगी बँकेत पैसे साठवताना ती कधी भरते याची वाट पाहायचो. कारण ती भरली की मग त्या पैशातून आवडीचे खेळणे किंवा कपडे घ्यायची आपली इच्छा असायची. तसंच.
तीच पिगी बँक आता आली आहे जार या पद्धतशीर ऑटोमेटेड ॲपच्या स्वरूपात.
पण जरा थांबा, हे पैसे जातात कुठे हे तर आपण पाहिलंच नाही की? तुमचे हे तफावतीचे पैसे गुंतवले गेले आहेत ९९.९९% शुद्ध डिजिटल गोल्डमध्ये! ते जागतिक दर्जाच्या तिजोऱ्यांमध्ये सुरक्षित आहेत, आणि भारतातल्या अग्रणी बँकांनी त्याचा विमा उतरवला आहे.
होय, हे ॲप परस्पर तुमच्या बँक खात्यातून यूपीआय ऑटो-पेद्वारे ५ रुपये वळते करून घेते. आहे ना कमाल? आता एवढं तुम्हाला पुरेसं वाटत नसेल तर आणखीनही बरंच आहे.
जार ॲप देत असलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण सुविधा पाहा:
● किमान ₹१ इतकी गुंतवणूकही करता येते : खरं वाटत नाही ना? जार ॲपद्वारे तुम्ही अगदी १ रुपयाइतकी कमी रक्कमदेखील डिजिटल गोल्डमध्ये गुंतवू शकता.
● चुटकीसरशी साईन-अप करा : एक अँन्ड्रॉईड फोन आणि जार ॲप एवढं असलं की तुम्ही ३० ते ४५ सेकंदांत खाते उघडून गुंतवणूक करणं चालू करू शकता. क्लिष्ट केवायसी करण्याची किंवा बँक खात्याबरोबर जोडणीची गरज नाही! आता यापेक्षा सोपं आणि काय असणार?
● कोणतीही कमिटमेंट नाही : तुम्ही जार ॲप वापरता तेव्हा तुमच्या पैश्यांवर नियंत्रण तुमचेच असते. तुम्ही हवे तेव्हा गुंतवणूक थांबवू शकता किंवा पुन्हा चालू करू शकता. तुमच्या खात्यातून दरमहा मोठी रक्कम वळती केली जाण्याचा कोणताही ताण यात नाही.
● तुम्हाला कशी बचत करायची आहे ते निवडा : बचत करण्याचे जार तुम्हाला दोन पर्याय देते. तुम्ही दररोज बचत करायची असलेली रक्कम निवडू शकता किंवा राऊंडिंग अप पर्याय निवडू शकता ज्याने तुमच्या प्रत्येक खरेदीमागे फरकाची रक्कम परस्पर वळती होईल.
● तुमची आधीची बचत दुप्पट करा : प्रत्येक वेळी रक्कम वळती केल्यानंतर एक गेम सुरू होईल. तुम्ही जिंकलात तर तुम्हाला तुमची यआधीची बचत दुप्पट करण्याची संधी मिळते! बचत करणं नेहमीच इतक्या हसत खेळत झालं असतं तर!
● कोणत्याही वेळी बाहेर निघा : तुम्ही तुमचे सोने कोणत्याही वेळी, तुम्हाला हवे तिथे विकू शकता. त्याचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील.
बचत (आणि खर्च!) करणं इतक गमतीचं कधीच नव्हतं! आता अजून कसली वाट पहाताय? आत्ताच जार ॲप डाउनलोड करा आणि साध्या सोप्या मार्गाने बचत करायला सुरुवात करा.
डिजिटल गोल्ड गुंतवणूक करण्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आमचे डिजिटल गोल्डबद्दल सर्वात जास्त विचारले जाणाऱ्या प्रश्नांचे पान आणि इतर शंका बघा.