Buy Gold
Sell Gold
Daily Savings
Round-Off
Digital Gold
Instant Loan
Nek Jewellery
जग विकसित होत आहे, तसेच सोनेही. डिजिटल गोल्डबद्दल वाचा, त्यात कशी प्रगती होत आहे आणि तुम्ही त्यात गुंतवणूक का करावी.
चला एका छोट्या गोष्टीपासून सुरुवात करूया.
“१९५०च्या दशकातील रमण या श्रीमंत व्यक्तीकडे भरपूर सोने होते. तो ते सोने आपल्या पलंगाखाली ठेवत असे.
आणि तो मिळवलेल्या वस्तू आणि सेवांसाठी त्याची देवाणघेवाण करत असे. एके दिवशी त्याचे सोने चोरीला गेल्याचे त्याला आढळले. तो असहाय्य झाला होता.
१९८०च्या दशकात वृद्ध रमणचा मुलगा रतननेही बरेच सोने केले. तो गमावेल अशी भीती त्याला वाटत होती.
म्हणून, त्याने गोल्ड लोनसाठी अर्ज केला आणि ते बँकेत साठवले. सोने सुरक्षित होते. मात्र व्याजासह बँकेचे पैसे फेडणे त्यांना अवघड जात होते.
२०१०च्या दशकात वृद्ध रमणचा नातू राकेशने चांगली कमाई केली.
त्याला त्याच्या वडीलांसारखे आणि आजोबांसारखे पैसे गमावायचे नव्हते, म्हणून त्याने डिजिटल गोल्ड विकत घेतले. त्याने सोन्याचा भाव वाढण्याची वाट पाहिली.
त्याने ते विकले आणि भरपूर नफा कमावला.”
त्यामुळे तुम्ही पाहता, काळ बदलतो आणि बचतीच्या पद्धतीही बदलतात. ही तीन उदाहरणे आपल्याला हे दर्शवतात की कालांतराने तिघांपैकी प्रत्येकाने आपला धडा कसा शिकला आणि आपले मार्ग कसे बदलले.
असे म्हटले जाते की सर्व चुका स्वतःहून करण्याची गरज नाही आणि इतरांच्या चुकांमधूनही शिकले पाहिजे, म्हणूनच, आपणही आता तेच करण्याची वेळ आहे.
जेव्हा आपण वेळेनुसार चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतो, तर १९००च्या काळात का अडकून राहायचे? डिजिटल व्हा. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करा. आणि विश्वास ठेवा किंवा नाही,
तेही अतिशय वेगाने. ब्लॉकचेनच्या काळात, वास्तविक सोन्याचा दावा करण्याच्या मोठ्या प्रमाणातल्या अडचणींपासून दूर राहून सोन्यात सरळ गुंतवणूक करण्याची संधी म्हणून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक वाढली आहे. आज १० कोटीहून अधिक ग्राहकांकडे डिजिटल सोने आहे.
डिजिटल गोल्ड, सोप्या शब्दात, ऑनलाइन चॅनेलद्वारे सोने खरेदी करण्याची एक नवयुगीन आवृत्ती आहे.
हे दिवसाचे २४ तास, आठवड्याचे ७ दिवस उपलब्ध असते. एखादी व्यक्ती त्याच्या कार्यालयातून, निवासस्थानातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून ॲक्सेस करू शकते, खरेदी करू शकते, विक्री करू शकते आणि पूर्तता(रिडीम) करू शकते.
डिजिटल गोल्ड हे मुळात क्रिप्टो करन्सीसारखे ब्लॉकचेन-आधारित ॲडव्हान्स टोकन तंत्रज्ञान आहे.
तथापि, क्रिप्टो करन्सीच्या विपरीत, या टोकनची खरी किंमत ही, वास्तविक अस्सल सोन्याच्या साठ्याइतकी रक्कम राखली जाते.
"बनावट" डिजिटल गोल्ड खरेदी करण्याची कोणतीही शक्यता नाही.
त्याचे सरळ उत्तर आहे, गुंतवणूक करावी.
का?
● डिजिटल सोन्याची गुंतवणूक २४ कॅरेट सोन्यात केली जाते, त्यापरि भौतिक सोन्याला अशुद्धतेची चिंता असते.
● डिजिटल सोन्याच्या किमती देशभरात सारख्याच असल्याने, एखाद्याला ऑनलाइन आणि पूर्णपणे पारदर्शक बाजार दरांवर सोने खरेदी आणि विक्री करणे सोपे होते.
● डिजिटल गोल्ड हे इतर प्रकारच्या सोन्यापेक्षा किमतीच्या बाबतीत वेगळे आहे. एकवेळ ३% जीएसटी(GST) व्यतिरिक्त कोणतेही आवर्ती वार्षिक शुल्क लागू होत नाही.
● शिवाय, डिजिटल गोल्डसह, तुम्ही ₹ १ इतक्या लहान रकमेची गुंतवणूक सुरू करू शकता; जी केवळ एक सुलभ गुंतवणूक योजनाच नाही तर एक सुलभ बचत योजना देखील दिसते.
● डिजिटल सोने खरेदी करताना १ रुपयाच्या तुलनेत १ ग्रॅम (अंदाजे ₹ ४,५०० इतके) उत्पादनांमध्ये भौतिक सोने खरेदी करणे आवश्यक आहे.
● शिवाय, रत्ने आणि सजावटींवर जास्त खर्च येतो आणि सामान्यतः चोरीचा धोका असतो.
● वास्तविक सोने विकण्यामध्ये सोनाराला खर्च देणे समाविष्ट आहे जेथे तुमच्या आर्थिक शिल्लकीमध्ये त्वरित रोख रक्कम जमा केल्यावर डिजिटल सोने विकले जाऊ शकते.
● फक्त एक फोन, इंटरनेट सुविधा आणि यूपीये(UPI) किंवा बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच हे इतर वस्तूंसाठी इंटरनेटवर खरेदी करण्याइतकेच सरळ आहे.
● प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यापूर्वी आणि खरेदी करताना अनेक बाबींचा विचार करणे आवश्यक आहे, त्यासाठी बरीच कागदपत्रे करावी लागतील, तर डिजिटल सोने ही आजकाल लोकांची वाढती पसंती आहे, कारण तो बचत आणि गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा आणि कमी खर्चिक मार्ग आहे. आणि इतकेच नाही तर ते सुरक्षित आणि विमा असलेले सोने आहे.
फिजिकल गोल्ड आणि डिजिटल गोल्डमधील फरक जाणून घेण्यासाठी येथे अधिक वाचा.
कालांतराने अनेक प्रसंगी हा प्रत्यय येत आहे की सोने महागाईपासून एक ठोस संरक्षण देते.
महागाईच्या वेळी सोन्याचे दर व्यावहारिकदृष्ट्या अप्रभावित राहतात. अशा प्रकारे, जेव्हा महागाई वाढेल आणि जागतिक बाजारपेठेत चलन दर कमी होतात तेव्हा तुम्हाला तोटा सहन करण्याची गरज नाही.
जेव्हा आपल्याला मार्केटचा अंदाज नसतो, तेव्हा सोने ही खात्रीशीर गोष्ट असेल अशी अपेक्षा असते. तज्ञांनी हे मान्य केले आहे की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोने जोडल्याने जोखीम कमी होते कारण त्याचे इतर ॲसेटशी शून्यच्या बरोबरीचा संबंध आहे.
वेगवान आणि धावपळीच्या जगामध्ये, जिथे कुणाला श्वास घ्यायलाही वेळ नाही किंवा इतर कोणासाठी थांबत नाही, जिथे डोळ्यांच्या पापण्या लवताच क्षणी कल व गोष्टी बदलतात आणि विशेषत: जिथे मार्केट कोणाच्याही मालकीचे नाही आणि कोणाचेही ऐकत नाही, आम्हाला खात्रीची, सुरक्षितता व स्थिरतेची गरज आहे. आणि डिजिटल गोल्ड हे त्यासाठीचा मार्ग आहे.
डिजिटल गोल्डबाबतीत इतका उत्साह का आहे ते बघा.
मग तुम्ही कशाची वाट पाहत आहात? आता जार ॲप डाऊनलोड करा आणि आजच डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा, फक्त १ रुपयापासून.