Playstore Icon
Download Jar App

Digital Gold म्हणजे काय? फायदे, जोखीम आणि कर. सविस्तर मार्गदर्शन

April 21, 2023

Table of Contents

    तज्ञांच्या सल्ल्यासह Digital Gold इन्व्हेस्टमेंट्सबाबत विस्तृत मार्गदर्शन. स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी Digital Gold बाबतचे सर्व गैरसमज आणि गोंधळ दूर करणे.

    Digital Gold म्हणजे काय? त्याचा प्रत्येक पैलू.

    Digital Gold ही ऑनलाइन चॅनेलद्वारे सोने खरेदी करण्याची नवीन युगातली पद्धत आहे.

    ज्यांना सोने खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी हा अधिक सोयीस्कर आणि कमी खर्चिक प्रभावी पर्याय आहे.

     

    आपण खरेदी केलेल्या प्रत्येक ग्रॅम सोन्याच्या प्रत्येक ग्रॅमसाठी, भारतातील तीन सोन्याच्या बँकांपैकी एक आपल्या नावावर लॉकरमध्ये वास्तविक 24K सोने साठवते - Augmont | MMTC - PAMP | SafeGold.‍

    गुंतवणूकदार ॲपचा वापर करून सोन्याची सहज खरेदी, विक्री करु शकतात किंवा सोन्याच्या होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर करू शकतात. तसेच Digital Gold खरेदी करण्यासाठी किमान मर्यादा नाही. आपण ₹1 पासून सुरुवात करू शकता.

    या लेखात, आपण मौल्यवान पिवळ्या धातूच्या या नवीन युगाच्या स्वरूपातील प्रत्येक पैलूत खोलवर जाऊन विश्लेषण करणार आहोत.

    Digital Gold इन्व्हेस्टमेंट कसे कार्य करते?

    कल्पना करा, आपण दागिन्यांच्या दुकानात जाता आणि ठराविक किंमतीत दागिना विकत घेता.

    आपल्याला प्रमाण आणि गुणवत्तेबद्दल खात्री नाही आणि दागिन्यांच्या घडणावळीच्या शुल्कासाठी अतिरिक्त पैसे देण्याची आवश्यकता आहे.

    आपण ते घरी घेऊन जाता आणि सुरक्षितपणे आपल्या लॉकरमध्ये जपून ठेवता. इथपर्यंत सगळे ठीक आहे, बरोबर ?

    यानंतर खालील दोन परिस्थिती उद्भवू शकतात:

    ●      समजा आपल्या घरावर दरोडा पडला आणि आपल्याकडे जे काही सोने आहे ते आपण गमावू शकता किंवा

    ●      जरी ते सुरक्षित असले, तरी जेव्हा आपण 10 वर्षांनंतर ते वापरता, तेव्हा डिझाइन कालबाह्य होऊ शकते, पॉलिश करणे आवश्यक आहे, परिणामी आपण आधीच गुंतवणूक केलेल्यापेक्षा जास्त खर्च करता.

    आता, कल्पना करा.

    आपण तेवढेच सोने ऑनलाइन खरेदी करता, ज्यावर 24K सोन्याच्या गुणवत्तेची हमी आहे, जे विक्रेत्यांनी विमा उतरवलेल्या तिजोरीत सुरक्षितपणे साठवले जाईल.

    आपण कमीत कमी ₹1 पासून गुंतवणूक करू शकता आणि भविष्यात, आपण एकतर ते बाजारभावाने विकू शकता किंवा ते भौतिक स्वरूपात आपल्या घरी होम डिलिव्हरी घेऊ शकता.

    हे सर्व फक्त आपला स्मार्टफोन वापरून!

    ऐकायला खूप चांगलं वाटतं ? ठीक आहे, पण याच्यात एक गोम आहे. आपण ते धारण करू शकणार नाही  सार्वजनिक ठिकाणी मिरवू शकणार नाही.

    यंग इंडियन्स मध्ये Digital gold च्या लोकप्रियतेत झालेली वाढ कमी प्रमाणात खरेदी करू शकणाऱ्या लवचिकतेला आणि सहज डिलिव्हरी घेण्याच्या शक्यतेला आणि लिक्विडिटी पर्यायांना मोठ्या प्रमाणात श्रेय दिले जाते.

    जेव्हा आपण कोणत्याही ॲपमधून Digital gold खरेदी करता, तेव्हा आपण प्रत्यक्षात मध्यस्थांकडून खरेदी करत असता ज्यामुळे आपल्याला Augmont Gold Ltd, Digital Gold India Pvt. Ltd. - SafeGold, आणि  MMTC-PAMP India Pvt. Ltd. सारख्या नामांकित कंपन्यांकडून ते सोने मिळण्यास मदत होते.

    मध्यस्थ गुंतवणूक शुल्क म्हणून काही टक्के शुल्क आकारतात कारण ते आपल्या digital gold च्या धारणेच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार आहेत.

    जर आपण आपला स्मार्टफोन गमावलात, तर आपले सोने नाहीसे होईल का?

    नाही! शेअर बाजारातील समभागांप्रमाणेच डिजिटल सोन्याचीही तुमच्या नावावर नोंदणी केली जाते.

    हे इन्शुअर्ड तिजोरीत सुरक्षितपणे साठवले जाते आणि स्वतंत्र विश्वस्ताद्वारे व्हेरिफाय केले जाते.

    हे आपल्या सोन्याची सुरक्षितता सुनिश्चित करते, जरी आपण सोने खरेदी करत असलेले अॅप गायब झाले तरी!

    Digital Gold कुठे विकत घ्यायचे?

    कोणीही कोणत्याही नोंदणीकृत ॲप्स आणि मध्यस्थांकडून digital gold खरेदी करू शकतो.

    ₹1 इतक्या कमी रकमेतूनही Jar App वरून digital gold विकत घेता येते.

    NPCI आणि बाजारातील सर्वोत्कृष्ट UPI सेवा प्रदात्यांशो जोडले गेलेले, Jar app आपोआप आपली बचत या लोकप्रिय मालमत्तेत गुंतवते, आणि त्यायोगे दररोज बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देते.   Jar App कसे वापरावे हे शिका.

    Digital gold KYC शिवाय विकत घेता येते परंतु ते खरेदी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर एका  विशिष्ट रकमेपर्यंत अवलंबून असते.

    काही लोकप्रिय ॲप्सवर ₹ 50,000 किंमतीच्या सोन्याची खरेदी करण्यासाठी KYC ची कोणतीही आवश्यकता नसते.

    Jar App वर,आपण KYC शिवाय 30 ग्रॅमपर्यंत digital gold खरेदी करू शकता.

    Digital Gold मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे.

    ●      Digital Gold ट्रॅक करणे सोपे आहे आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी त्यात प्रवेश केला जाऊ शकतो

    ●      हे उच्च लिक्विडिटी प्रदान करते आणि बाजार दराने दिवसाच्या कोणत्याही वेळी खरेदी आणि विक्री केली जाऊ शकते

    ●      देशव्यापी लॉकडाऊन आणि दागिन्यांची दुकाने बंद असल्याने  Digital Gold व्यापारी  Augmont Gold Ltd. कंपनीच्या व्यवसायात  40-50% इतकी वाढ झाली. हे दर्शविते की बरेच लोक digital goldला प्राधान्य देत आहेत.

    ●      सोने हे चलन फुगवट्या विरूद्ध  एक संरक्षण असल्याचे मानले जाते आणि कर्जासाठी तारण  म्हणून वापरले जाऊ शकते

    ●      गेल्या 92 वर्षांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. भारतात सांस्कृतिक महत्त्व असण्याव्यतिरिक्त, सोन्याला आंतरिक मूल्य देखील आहे आणि ते अधिक चांगल्या परताव्यासह एक मोठी मालमत्ता आहे.

    Digital Gold मध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे.

    ●      हे आपल्यासाठी कोणतेही निष्क्रिय उत्पन्न निर्माण करत नाही, म्हणजे आपल्याला आपल्या गुंतवणूकीवर कोणतेही व्याज मिळत नाही.

    ●      आणखी एक चिंतेचा मुद्दा म्हणजे digital gold SBI किंवा SEBIच्या अंडर येत नाही.

    ●      सोन्यातील जास्तीत जास्त गुंतवणूक बऱ्याच भागीदार प्लॅटफॉर्मवर 2 लाख रुपयांपर्यंत मर्यादित आहे ज्यामुळे काही गुंतवणूकदारांना अडचण होऊ शकते.

    ●      Digital Gold च्या डिलिव्हरी दरम्यान, होल्डिंग कंपन्या आपल्यासाठी सोने धारण करण्यासाठी एक लहान व्यवस्थापन शुल्क आकारतात.

    सुलभ लिक्विडिटी, सुरक्षितता आणि डिलिव्हरी पर्याय यांचा विचार केला तर, digital gold मध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे इतके मोठे वाटत नाहीत.

    ऑनलाइन खरेदीप्रमाणेच digital gold ची गुंतवणूकही सहज करता येते. Digital gold मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण केले जाऊ शकते.

     

    ●      Jar, Amazon, HDFC Securities, Paytm, इत्यादी सोन्याच्या गुंतवणूकीची सुविधा देणाऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जा.

    ●      'गोल्ड लॉकर/व्हॉल्ट' पर्याय निवडा.

    ●      Digital gold मध्ये गुंतवणूक करू इच्छित असलेल्या रक्कम एन्टर करा. Digital gold ची किंमत बाजारातील चढउतारांवर अवलंबून असते, त्यामुळे मध्यस्थांनी दिलेल्या निश्चित दराने ती खरेदी करता येते किंवा वजनाच्या आधाराने Digital gold खरेदी करता येते.

    ●      डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा फक्त रोखीतून पेमेंट करा.

    ●      पुढे, क्रेडिट केलेल्या सोन्याचे प्रमाण त्वरित अद्ययावत केले जाईल आणि आपले Digital gold 100% इन्शुअर्ड तिजोरीत जपून ठेवले जाईल.

    ●      Digital gold त्वरित विकले जाऊ शकते किंवा विकत घेता येते. गुंतवणूकदार त्यांचे Digital gold  बुलियन किंवा नाण्यांच्या स्वरूपात वितरित करू शकतात. अनेक Digital gold च्या मध्यस्थांकडे सोन्याच्या वितरणाची निश्चित मर्यादा आहे आणि त्यासाठी वितरण शुल्क आकारतात.

    Digital gold आणि फिजिकल सोन्यावर कर आकारणी:

    फिजिकल सोन्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर कर आकारला जातो. तो कर अल्पकालीन की दीर्घकालीन भांडवली नफा आहे यावर आधारित असतो.

    खरेदीच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत जर आपण आपल्या सोन्याची मालमत्ता (जी सोन्याचे दागिने, digital gold किंवा नाणी असू शकतात) विकली, तर त्या विक्रीतून मिळणारी रक्कम शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स (STCG) मानला जाईल.

    Digital Gold इन्व्हेस्टमेंट आणि फिजिकल गोल्ड इन्व्हेस्टमेंटवर कर आकारणी कशी कार्य करते याबद्दल सविस्तर मार्गदर्शक वाचा.

    Digital Gold कोणी विकत घ्यावे?

    ज्याला फिजिकल स्वरूपाचे सोने विकत घेणे परवडत नाही, किंवा पिवळ्या धातूत एका वेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकत नाही तो digital gold साठी जाऊ शकतो.

    Digital gold -समर्थित 99.9% 24 कॅरेट  शुद्धता आणि Jar App द्वारे ₹1 इतक्या कमी किंमतीत खरेदी केली जाऊ शकते याचा अर्थ एखाद्याला सुरक्षित ठिकाणी साठवण्याची चिंता करण्याची गरज नाही.

    आपल्याला फक्त आपल्या फोनवरील Jar Appची गरज आहे आणि आपण सेट आहात. आपण आपले पैसे Jar वरही ऑटो-इन्व्हेस्ट करू शकता. अधिक जाणून घेण्यासाठी Jar's FAQs तपासा.  

    Digital gold खरेदी करण्याची सोय करणाऱ्या विविध मध्यस्थांकडूनही digital gold खरेदी केले जाऊ शकते.

    Digital gold बाजाराच्या दराने त्वरित खरेदी आणि विक्री केली जाऊ शकते, याचा अर्थ बनावटीच्या शुल्कावर सूट मिळवण्यासाठी वेगवेगळ्या दागिन्यांच्या दुकानांना भेट देण्याची गरज नाही!

    गुंतवणूकदार सोन्याचे बाँड्स  आणि  सोन्याचे ETFs सारख्या digital gold च्या इतर प्रकारांमध्ये गुंतवणूक करू शकतात जे SEBI आणि RBIद्वारे नियंत्रित केले  जातात.

    SGBs च्या तुलनेत digital gold हे अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा एक फायदेशीर पर्याय वाटतो कारण रिडम्शनची लवचिकता.

    Digital gold, जसे SGBs मध्ये नसते, त्यात गुंतवणूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्मद्वारे त्वरित खरेदी आणि विक्री केली जाऊ शकते.

    SGBs ला मात्र 8 वर्षांचा कालावधी आहे परंतु त्याची एन्कॅशमेंट/रिडम्शनला जारी केल्याच्या तारखेनंतरच्या पाचव्या वर्षानंतरच परवानगी आहे.

    जेव्हा म्युच्युअल फंड आणि ETFs विचार केला जातो, तेव्हा फंड मॅनेजिंग कंपन्यांना खर्चाचे प्रमाण आणि इतर संबंधित शुल्कासह मोठा खर्च द्यावा लागेल.

    शेवटी, गुंतवणूकीच्या इकोसिस्टममध्ये सुरुवात करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी digital gold हा एक चांगला पर्याय वाटतो.

    Digital gold बद्दल ची एक चांगली गोष्ट म्हणजे त्यासोबत येणारी लवचिकता.

    वितरण सुलभतेसह दिवसाच्या कोणत्याही वेळी विक्री आणि खरेदी सुलभता भविष्यातील वापरासाठी सोने वाचवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय बनवते.

    Digital gold खरेदी करण्याचे बरेच सोपे मार्ग आहेत त्यापैकी एक Jar App आहे जे आपल्याला शक्य तितक्या सोप्या मार्गाने पिवळ्या धातूमध्ये गुंतवणूक करू देते.

    आपण केलेल्या व्यवहारातून दररोज बचत करण्यास मदत करून Jar आपल्याला आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करू शकते.

    Jar App आपोआप आपल्या बचत केलेल्या रकमेची digital gold मध्ये गुंतवणूक करते आणि यामुळे आपल्याला सुरक्षित भविष्यासाठी digital gold जमा करण्यास मदत होईल.