Buy Gold
Sell Gold
Daily Savings
Digital Gold
Instant Loan
Round-Off
Nek Jewellery
आपल्या किशोरवयीन मुलाशी पैशांच्या (आर्थिक) व्यवहारांबद्दल बोलायला हिम्मत होत नाही का? काळजी करू नका. आम्ही समजू शकतो. आपल्या किशोरवयीन मुलाला आर्थिक शिक्षण देण्याचे 6 मार्ग येथे आहेत.
पालकत्व सोपं नसतं. विशेषत: जेव्हा आपले मूल किशोरवयीन होते. आपण एकतर पुढे पाहता किंवा या काही वर्षांना घाबरता.
आपल्याला काहीही वाटत असले तरी, आपल्याला माहित आहे की आपण आपल्या मुलाला आता त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टींमध्ये मदत केली पाहिजे; पैशांचा समावेश असलेल्या बाबी सांगायला हव्यात.
आपला किशोरवयीन मुलगा मोठा होत आहे, निःसंशयपणे स्वातंत्र्यासाठी धडपडत आहे. हे असे वय आहे जिथे ते इतरांच्या सहवासापेक्षा एकटेपणात जास्त वेळ घालवतात.
म्हणूनच, ते महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास देखील सुरुवात करतील.
त्यांना पैशांचे महत्त्व शिकण्यास मदत करा. पैसे कसे मिळवायचे, त्याची बचत करून त्याचा आदर कसा करायचा. तुम्ही ज्या विषयांपासून आर्थिक गोष्टी शिकवण्याची सुरुवात करु शकता असे काही विषय पुढे दिले आहेत:
आपले किशोरवयीन मुल कदाचित आपल्याला म्हणेल, "मला नवीन स्मार्टफोनची, नव्या व्हिडिओ गेमची गरज आहे." त्यांना विचारा, "ही एक गरज आहे असं तुम्हाला का वाटतं?" विचारपूर्वक उत्तर ऐकण्याची तयारी ठेवा.
एखाद्या गोष्टीला गरज म्हणण्यामागे आपल्या किशोरवयीन मुलांकडे योग्य कारणं असली, तरी खंबीर राहा.
गरजा आणि इच्छा यांतील फरक स्पष्ट करताना त्यांना उदाहरणे द्या.
जर आपण त्यांच्या इच्छा पूर्ण करत राहिलात, तर सुरुवातीला ती कदातिच समस्या वाटणार नाही, पण एकदा का ती सवय झाली आणि इच्छा म्हणजेच गरज वाटू लागली, की वाद निर्माण होतील.
परंतु आपण आपल्या मुलांना असा संदेश पण द्यायला नको की त्यांच्या इच्छा महत्त्वाच्या नाहीत.
त्यांच्या इच्छेसाठी पैसे वाचवण्यासाठी बचत खाते उघडण्याचा पर्याय त्यांना द्या.
आपल्या किशोरवयीन मुलाचे पहिले बँक खाते सेट करणे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जसे की दात गमावणे किंवा वाहन चालवायला शिकणे.
त्यांनी त्यांच्या पहिल्या वाढदिवशी त्यांना मिळालेल्या पिगी बँकेला आता बहुदा मागे टाकले आहे. म्हणजे खरे खुरे बँक खाते उघडण्याची वेळ आली आहे, बरोबर?
ते अद्याप वयाने लहान असल्याने संयुक्त खाते उघडू शकता. किंवा आपण खात्याचा साइनर बनू शकता जेणेकरून आपण त्यांच्या खर्चाच्या सवयींवर लक्ष ठेवू शकता.
त्यांच्या खात्यांचा मेळ कसा घालायचा, त्यांच्या खर्चाचा मागोवा कसा घ्यायचा आणि बचत कशी करायची हे त्यांना शिकवण्याची ही एक उत्तम संधी आहे.
जर आपण आपल्या मुलासाठी बचत खातं काढलं असेल, तर या वयात त्यांना त्याचे नियंत्रण द्या.
नियमित बचतीच्या सवयी विकसित करण्यात त्यांना मदत करा आणि आपल्याला आपल्या बचतीत केव्हा हात घालावा लागेल याबद्दल बोला.
मुले त्यांच्या पालकांकडून शिकतात, म्हणून खात्री करा की तुम्हाला योग्य बचत आणि गुंतवणूकीच्या सवयी आहेत ज्याचे ते अनुकरण करु शकतात.
हे एक उदाहरणाने दाखवून द्या. स्वत:च्या बचतीच्या टिप्स त्यांच्यासोबत शेअर करा. आपल्या खिशाला चाट न पडता आपण पैशाची बचत कशी सुरू करू शकता हे त्यांना एक्सप्लोर करायला शिकवा.
आपल्या मुलांना बजेट कसे तयार करावे आणि कसे सांभाळावे हे शिकवा. त्यांच्यामध्ये हे रुजवा की बजेटिंग म्हणजे बाइक चालवण्यासारखे नाही (एकदा शिकलो की नंतर आपण कधी ते विसरू शकत नाही).
त्यांना त्यांच्या सर्व बचतीवर आणि खर्चावर लक्ष द्यायला सांगा.
त्यांना आपले बजेट दाखवा आणि त्यांनाही त्यांच्या स्वत:च्या बजेटमध्ये तुमच्या बजेटची पुनरावृत्ती करण्यात मदत करा.
ते सतत मोबाइलला चिकटलेले असल्याने त्यांना साध्या बजेट ॲपबद्दल सांगा?
आपले किशोरवयीन मूल अद्याप क्रेडिट कार्ड बाळगण्याइतके किंवा कर्जासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसे मोठे झालेले नाही, परंतु काही वर्षांत होईल.
आपण कर्जावर किती पैसे खर्च करीत आहात आणि आपल्याकडे ते का आहे हे आपल्या मुलास समजावून देण्यासाठी वेळ काढा.
जर आपले मूल 18 वर्षांचे झाल्यावर महाविद्यालयात जात असेल तर कोणत्याही गोष्टीसाठी कोठेही कोणत्याही कर्जासाठी (विशेषत: विद्यार्थी कर्ज) किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांना कर्जाच्या वास्तविक किंमतीची माहिती आहे याची खात्री करा. त्यांच्या ऑफरच्या अटी समजून घेण्यास त्यांना मदत करा.
याव्यतिरिक्त, त्यांच्याशी इंटर्नशिप, नोकरी, पे चेक आणि करांबद्दल चर्चा करा.
आपण देण्यात चूक करू शकत नाही, बरोबर? पैसे कमावणे, बचत करणे, खर्च करणे आवश्यक असले, तरी जे कमी सुदैवी आहेत किंवा गरजू आहेत अशा इतरांना मदत करणे देखील महत्वाचे आहे.
आपल्या किशोरवयीन मुलांसाठी आपण करू शकता अशा सर्वात चांगल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्यांना देण्याच्या शक्तीबद्दल समजून घेण्यास आणि त्याचा अभिमान बाळगण्यास शिकविणे.
त्यांनी त्यांच्या भत्त्यामधून किंवा इतर कमाईमधून पैसे का दान करावेत हे त्यांना समजावून सांगा.
जेव्हा आपण आपल्या मुलांना लहान वयातच देण्याचं मूल्य शिकवाल, तेव्हा त्यांना ते किती चांगलं असत हे लक्षात येईल आणि कदाचित जेव्हा ते स्वत:चा रोख सांभाळतात तेव्हा ही परंपरा पुढे चालू ठेवतील.
आशा आहे की हे काही उपक्रम आपल्या किशोरवयीन मुलास महाविद्यालयासाठी पैसे वाचविण्यास, आपत्कालीन परिस्थितीची योजना आखण्यात मदत करतील आणि कदाचित लहानपणापासूनच गुंतवणूक करण्यास मदत करतील.
जर त्यांना ते लगेच समजले नाही तरी काळजी करू नका. त्यांच्या सुरुवातीच्या काळात एक मजबूत आर्थिक पाया तयार केल्याबद्दल ते नंतर नक्कीच आपले आभार मानतील.
आपण आपल्या मुलांशी आर्थिक व्यवहारांबद्दल संभाषण कसे सुरू करू शकता ते पहा (वय 3 ते 13).