Playstore Icon
Download Jar App
Digital Gold

जार ॲप - डिजिटल गोल्डबद्दल असलेल्या मिथकांचा पर्दाफाश

December 29, 2022

डिजिटल गोल्डच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, त्याबद्दल अनेक मिथक (काल्पनिकरित्या रंगवलेल्या गोष्टी) पसरत आहेत. त्याबद्दलच्या काही चुकीच्या समजांना आज आपण वाचा फोडूया.

आपल्या सर्वांना माहित आहे की सोने हा गुंतवणूकीचा कायम स्वरूपी सदाबहार पर्याय आहे. आणि सोने सातत्याने आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय मालमत्तांपैकी एक राहिलेले आहे.

भौतिक स्वरूपात (दागिने, नाणी किंवा बार) खरेदी करण्याव्यतिरिक्त आज, आमच्याकडे या पिवळ्या धातूमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध  आहेत.

डिजिटल क्रांतीची  वाढ होत  असताना, अलिकडच्या वर्षांत  सोन्याच्या बाजारपेठेतही ही त्याचा प्रसार झाला, ज्याने आमची ओळख करून दिली आहे: डिजिटल गोल्ड. तुलनेने भारतासाठी ही संकल्पना  नवीन आहे, पण मुल्य निर्धारित योग्यता तपासण्यासारखी आहे.

डिजिटल गोल्ड म्हणजे काय?

डिजिटल गोल्ड नवीन स्वरूप आहे ज्यात  ऑनलाइन माध्यमातुन  सोने खरेदी करता येते. ज्यांना सोने खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी हा अधिक सोयीचा आणि किफायतशीर पर्याय आहे.

तुम्ही विकत घेतलेल्या प्रत्येक ग्रॅम सोन्यामागे, भारतातील तीन गोल्ड बँकांपैकी एका मध्ये  तुमच्या नावावर लॉकरमध्ये 24k सोने ठेवलेले असते - Augmont | MMTC - PAMP | सेफगोल्ड.

अ‍ॅपवरील एका बटणावर क्लिक करून गुंतवणूकदार घरपोच सोने खरेदी, विक्री किंवा ऑर्डर करू शकतात. तसेच, डिजिटल सोने खरेदी करण्यासाठी कोणतीही किमान मर्यादा नाही. तुम्ही कमीत कमी ₹1 पासून सुरुवात करू शकता. मस्त आहे ना?

परंतु त्याच्या वाढत्या लोकप्रियतेसह, गुंतवणूकदारांमध्ये मिथक आणि काही गैर समजुती च्या अफवा देखील हवेत तरंगत आहे. परिणामी,  गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमधील अशा मौल्यवान गुंतवणुकीला मुकतात.

चला तर मग डिजिटल गोल्ड बद्दल काही सामान्य गैरसमज आणि मिथक काढून टाकूया:

मिथक 1: सोने महाग आहे आणि फक्त श्रीमंत लोकच ते घेऊ शकतात.

अजिबात नाही ! डिजिटल गोल्डमध्‍ये गुंतवणूकीचा सर्वात चांगला भाग असा आहे की तुम्‍हाला ते जार ॲपद्वारे अगदी ₹1 च्‍या किमतीत सुद्धा विकत घेता येते.

हो हे खरे आहे! सोने स्वस्त किंमतीत खरेदी केले जाऊ शकते आणि ते बजेटसाठी अनुकूल आहे. पूर्वी अशक्यप्राय वाटणारा  मौल्यवान धातू, आता सगळीकडे  आणि प्रत्येकासाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. आम्हाला ते आवडते आहे !

मिथक  2: सोन्यात गुंतवणूक करणे खूप धोकादायक आहे.

प्रत्येक गुंतवणूक काही जोखीम घेऊन येते आणि त्याचे स्वतःचे फायदे आणि तोटे असतात. सोन्याच्या बाबतीत ही तसेच आहे.

किंबहुना, सोन्यामधील जोखीम घटक स्टॉक आणि इक्विटी सारख्या इतर अत्यंत अस्थिर गुंतवणुकीपेक्षा कमी आहे. सोने ही एक आकर्षक गुंतवणूक आहे, एक मौल्यवान नैसर्गिक संसाधन आहे ज्याची सतत मागणी असते.

हे महागाई आणि धोकादायक गुंतवणुकीविरूद्ध बचावासाठी चांगले आहे.

मिथक 3: डिजिटल सोने हे खरे सोने नाही.

हे आहे! जेव्हा तुमची सोन्याची साठवणुक  0.5gm असते, तेव्हाच  तुम्ही ते भौतिक सोन्यात रूपांतरित करू शकता - नाणी किंवा दागिने.

जार ॲपद्वारे तुम्ही बचत केलेल्या सोन्याचे रूपांतर भौतिक स्वरुपात करून ते काढू शकता आणि तुम्ही ते कधीही घरी बसल्या मिळवु शकता.

मिथक 4: सोने ही वाईट गुंतवणूक आहे.

वस्तुस्थिती प्रत्यक्षात उलट आहे. विचारपूर्वक केलेल्या सोन्याच्या गुंतवणुकीतून चांगला मोबदला मिळू शकतो.

खरं हे आहे की. सोन्याचा वापर शेअरच्या घसरत्या किमतींपासून बचाव म्हणून तसेच गुंतवणुकीचा पर्याय म्हणून केला जाऊ शकतो.

हे आर्थिक मंदी आणि व्यापारिक मंदीपासून संरक्षण करते. गेल्या 92 वर्षांपासून सोन्याचे दर वाढत आहेत.

भारतात सांस्कृतिक महत्त्व असण्यासोबतच, सोन्याचे आंतरिक मूल्य देखील आहे आणि वर्षभरात आणखी चांगल्या परताव्यासह ही एक उत्तम मालमत्ता आहे.

हिरे किंवा प्लॅटिनम यांच्या तुलनेत, ज्यांचे पुनर्विक्रीचे मूल्य सोन्यासारखे नसते, सोन्याला नेहमीच गुंतवणुकीचा एक मजबूत पर्याय मानला जातो. त्यासाठी सोन्याचा च पर्याय निवडा !

मिथक  5: सोने खरेदी करणे कठीण आहे आणि त्यासाठी खूप कागदपत्रांची आवश्यकता आहे.

नाही, डिजिटल सोने खूप सोपे आणि सोयीस्कर आहे. तुम्हाला फक्त फोन, जार ॲप, इंटरनेट ॲक्सेस आणि बँक खाते किंवा UPI खाते हवे आहे.

जादू पहा! काही वेळात सोने तुमच्याकडे येत आहे. जार ॲपवर, तुम्ही KYC शिवाय 30 ग्रॅम पर्यंत डिजिटल सोने खरेदी करू शकता.

तुमचा व्यवहार रु 2 लाखांपेक्षा जास्त असेल तरच., तुम्ही तुमची पॅन कार्ड माहिती पुरवणे आवश्यक आहे.

मिथक  6:  छुपी किंमत आणि स्टोरेज फी जास्त असते.

जारचा पारदर्शकतेवर विश्वास आहे. जेव्हा तुम्ही जार ॲपद्वारे गुंतवणूक करता तेव्हाच तुम्ही शुद्ध सोन्याचा व्यापार करता, जे 24 कॅरेट सोन्याचे असते. तुम्ही खर्च केलेली एकूण रक्कम फक्त सोन्यात गुंतवली जाते.

खरेदी करताना तुम्हाला फक्त 3% GST भरावा लागेल. कोणतीही छुपी किंमत किंवा स्टोरेज फी नाही.

सर्व डिजिटल सोने उच्च दर्जाच्या-सुरक्षा वॉल्टमध्ये कोणतेही शुल्क न आकारता ठेवले जाते आणि सोन्याचा पूर्ण विमा उतरविला जातो.

मिथक  7: ऑनलाइन सोने हे शुद्ध सोने नसते.

जार वर, डिजिटल सोन्याला 99.5% 24 कॅरेट शुद्धता आहे. जेव्हा तुम्ही डिजिटल सोने खरेदी करता, तेव्हा तुम्ही सोने मिळवण्यात मदत करणाऱ्या ऑगमॉन्ट गोल्ड लिमिटेड, डिजिटल गोल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,  सेफगोल्ड, आणि एमएमटीसी-पीएएमपी इंडिया प्रा. लि. सारख्या नामांकित कंपन्यांसारख्या मध्यस्थांकडून ते खरेदी करता. त्यामुळे ते खरे, सुरक्षित आणि शुद्ध आहे.

अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे ? डिजिटल गोल्डबद्दल अधिक वाचा. डिजिटल गोल्ड  हे प्रत्यक्ष सोन्यापेक्षा कसे उत्तम आहे ते जाणून घ्या.

अजूनही अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात? FAQ आणि जार पहा.

आता आम्ही तथ्ये स्पष्ट केली आहेत, पाहा डिजिटल गोल्ड गुंतवणूक म्हणून किती चांगले आहे ? चुकवू नका.

खरं तर, जार हे डिजिटल गुंतवणूक ॲपपेक्षा बरेच काही आहे. हा एक स्वयंचलित गुंतवणूक प्लॅटफॉर्म देखील आहे जो तुम्हाला तुमच्या खिशाला चाट न पाडता तुमचे पैसे वाचवण्यास मदत करतो.

जार ॲपद्वारे लगेचच डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यास लगेच सुरुवात करा!

Subscribe to our newsletter
Thank you! Your submission has been received!
Oops! Something went wrong while submitting the form.