फ्रीलान्सर अथवा स्वयंरोजगार मिळविणाऱ्या व्यक्तीने ITR/इन्कम टॅक्स रिटर्न कसे फाईल करावे – संपूर्ण मार्गदर्शन

Author Team Jar
Date Apr 21, 2023
Read Time Calculating...
फ्रीलान्सर अथवा स्वयंरोजगार मिळविणाऱ्या व्यक्तीने ITR/इन्कम टॅक्स रिटर्न कसे फाईल करावे – संपूर्ण मार्गदर्शन

आम्ही येथे एखाद्या फ्रीलान्सरने इन्कम टॅक्स कसा फाईल करावा याबद्दल आवश्यक असणारी सर्व माहिती दिलेली आहे.

तुम्ही फ्रीलान्सर आहात? तुम्हाला 9 ते 5 काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसारखे उत्पन्न मिळत नाही? पण तुमचे उत्पन्न मात्र इन्कम टॅक्स एक्झम्शन पातळीपेक्षा जास्त आहे ?

तर मग इन्कम टॅक्स कायद्यानुसार, तुम्हीरिटर्न इन्कम टॅक्स रिटर्नफाईल करणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स कायद्यातील तरतुदीनुसार फ्रीलान्सरनेही इतर नोकरदार किंवा कॉर्पोरेट करदात्यांप्रमाणेच त्यांच्या उत्पन्नावरील कर (टॅक्स) भरणे अपरिहार्य आहे.

‍आम्ही Jar च्या माध्यमातून तुम्हाला तुमचा टॅक्स अतिशय सोप्या पद्धतीने आणि वेळेवर भरता यावा यासाठी मदत करतो.

फ्रीलान्सर म्हणजे कोण आणि त्यांनी इन्कम टॅक्स फाईल करावे का?

फ्रीलान्सर म्हणजे स्वतंत्रपणे काम करून स्वयंरोजगार मिळविणाऱ्या व्यक्ती, ज्या त्यांच्या सोईप्रमाणे स्वत:च्या घरातून, बागेतून वा एखाद्या दुकानातून विविध ग्राहकांच्या विविध प्रोजेक्ट्सची कामे करतात.

‍मार्केटिंग कन्सल्टंट्स, वेबसाईट डिझायनर्स, कन्सल्टन्सीज, सॉफ्टवेअर डिझायनर्स, सोशल मिडिया मॅनेजर्स, आणि कंटेंट रायटर्स यासारखे व्यावसायिक इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास पात्र असतात. हे फ्रीलान्सर्स त्यांच्या ग्राहकांना श्रमिक किंवा बौद्धिक सेवा पुरवून पैसे मिळवतात.

अर्थात, ही सोय घेण्यासाठीही काही खर्च करावा लागतो. इन्कम टॅक्स कायद्यानुसार, इतर उद्योजक किंवा नोकरदार व्यक्तींप्रमाणेच फ्रीलान्सर्सनाही त्यांच्या उत्पन्नावर सरकारला कर भरणे आवश्यक असते.

फ्रीलान्सरसाठी इन्कम टॅक्स फाईलिंग – अकाउंटींग पद्धती

फ्रीलान्सर म्हणून इन्कम टॅक्स भरणे जरा कठीण जाऊ शकते कारण तुम्हाला HR (एचआर) डिपार्टमेंटकडून दिला जाणारा फॉर्म 16 किंवा इन्कम टॅक्स फाईल करण्यासाठी त्यांची इतर मदतही मिळू शकत नाही.

‍याशिवाय जर तुमच्याकडे अनेक ग्राहक असतील आणि उत्पन्नाची वा खर्चाची वेगवेगळी रक्कम असेल तर त्यासाठी अधिक गणना आणि रेकॉर्ड ठेवण्याची गरज भासते.

‍इतर व्यवसाय किंवा उद्योगासाठी ज्याप्रकारे उत्पन्न किंवा खर्चाची नोंद ठेवली जाते त्याचप्रकारे फ्रीलान्सर म्हणून तुम्हालाही इन्कम टॅक्स फाईलिंगच्या काही मुलभूत तत्वांचे पालन करणे आवश्यक असते.

तुमच्याकडे वेगेवगळ्या मार्गांनी उत्पन्न येऊ शकते जसे, प्रोजेक्टच्या संदर्भातील पेमेंट, मासिक रिटेनर्स ई.  इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 44AA नुसार, तुम्ही तुमच्या उत्पन्न आणि खर्चाची योग्य नोंद ठेवण्यासाठी अकाउंटींग बुक (लेखापुस्तक) ठेवणे आवश्यक आहे.

‍यासाठी (अक्रुअल बेसिस) अकाउंटिंगचा जमा आधार आणि (कॅश बेसिस) अकाउंटिंगचा रोख आधार यापैकी निवड करा.

फ्रीलान्सर्ससाठी लागू असणारे कर आणि इन्कम टॅक्स फाईलिंग

भारतात, फ्रीलान्सर्सना इन्कम टॅक्स आणि GST/जीएसटी (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) भरणे आवश्यक आहे. जर फ्रीलान्सर्सचे वार्षिक उत्पन्न INR 20 लाखपेक्षा अधिक असेल (ईशान्येकडील व डोंगराळ राज्यांसाठी INR 10 लाख), तर त्याने/तिने GST/जीएसटीसाठी रजिस्टर करणे आवश्यक आहे.

‍बहुतांश सेवांसाठी GST/जीएसटीचा दर 18% आहे परंतु फ्रीलान्सर्स ज्या वस्तू किंवा सेवा पुरवत असतील त्यानुसार हा दर वेगळा असू शकतो.

याव्यतिरिक्त फ्रीलान्सर्सना सध्याच्या दराने इन्कम टॅक्ससुद्धा भरावा लागेल. वय वर्षे 60 खालील फ्रीलान्सर्सना लागू होणारा इन्कम टॅक्स दर खालीलप्रमाणे:

जुन्या कर प्रणालीनुसार:

नव्या कर प्रणालीनुसार:

फ्रीलान्सरने कोणता इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म भरावा?

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना फ्रीलान्सरने फॉर्म ITR 4 चा वापर करावा. जर तुमचे उत्पन्न INR 1 कोटी पेक्षा अधिक असेल तर तुमच्या अकाउंट बुक्सचे ऑडीट करणे आवश्यक असते.

‍जर तुमचे उत्पन्न INR 1 कोटींपेक्षा कमी असेल तर ऑडीट करण्याची आवश्यकता नाही. फ्रीलान्सरने कर आकारणीची अनुमानित पद्धत अवलंबली असल्यास फॉर्म ITR 4S चा वापर करावा.

फ्रीलान्सर्ससाठी इन्कम टॅक्स फाईलिंग करण्याची पद्धत

फ्रीलान्सर्सनी इन्कम टॅक्स रिटर्नचे फाईलिंग करण्यासाठी खालीलप्रमाणे सोप्या पद्धतीचा वापर करावा:

●   पायरी 1: ई-फाईलिंगसाठी अधिकृत अशा इन्कम टॅक्स पोर्टलला भेट द्या.

●   पायरी 2: ‘डाऊनलोड’ या पेज अंतर्गत उपलब्ध असणारा ITR-4 हा फॉर्म डाऊनलोड करा. 

●   पायरी 3: ITR-4 फॉर्ममध्ये तुमची सर्व माहिती भरा.

जसे,सर्वसाधारण माहिती, एकूण उत्पन्न, वजावट आणि करपात्र उत्पन्न, व्यवसाय आणि व्यावसायिक उत्पन्नाचा तपशील, TDS (टॅक्स डीडक्टेड ऍट सोर्स/ स्त्रोतावर वजा केला जाणारा कर) तपशील, आणि आगाऊ कर (ऍडव्हान्स टॅक्स) आणि स्व-मूल्यांकन कर (सेल्फ असेसमेंट टॅक्स) तपशील ई. 

●   पायरी 4: तुमच्या टॅक्सची गणन करण्यासाठी फॉर्म 26AS चा वापर करा.

तुम्ही तुमच्या उत्पन्नावरील कर वाचविण्यासाठी विविध विभागांतर्गत कर कपात आणि सवलतींचा दावा करू शकता. कर लागू असणाऱ्या वर्षात पूर्णत: स्वतंत्रपणे केलेल्या फ्रीलान्स कामावरील खर्च, जसे मालमत्ता भाडे, दुरुस्ती शुल्क, प्रवास खर्च, कंपनीच्या मालमत्तेवरील नगरपालिका कर आणि डोमेन नोंदणी खर्च यासारख्या खर्चाच्या रकमेचा सवलतीसाठी दावा करता येऊ शकतो.

ITR इन्कम टॅक्स रिटर्न सबमिट करताना लक्षात ठेवावयाच्या काही गोष्टी:

  • (ग्रॉस रिसीट) एकूण पावत्यांची यादी करणे - फ्रीलान्सर्सनी एका आर्थिक वर्षात पूर्ण केलेल्या फ्रीलान्सिंग कामाच्या सर्व पावत्यांची नोंद ठेवावी.
  • (क्लेम एक्स्पेन्सेस) दावा खर्च - खर्चाचा दावा करताना, फ्रीलान्सर्सनी खालील मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत:
  •  फ्रीलान्स कामाचा परिणाम म्हणून खर्च केला जातो.
  •  खर्च एका आर्थिक वर्षादरम्यान केला जातो, जसे उदाहरणार्थ, मूल्यांकन वर्ष/AY 2021-22 साठी आर्थिक वर्ष/FY 2020-21.
  •  हे खर्च वैयक्तिक किंवा भांडवली खर्च नसतात.
  •  खर्च कोणत्याही कारणासाठी केला जात नाही, तसे करणे कायद्याने निषिद्ध असून तो फौजदारी गुन्हा मानला जातो.
  •  जर रोखीने पैसे दिले असल्यास, एकूण INR 10,000 पेक्षा जास्त प्रतिदिन खर्च वजावट म्हणून धरला जाणार नाही.
  •  भांडवली खर्चाचा खर्च म्हणून दावा करता येऊ शकत नाही, जसे लॅपटॉप, फर्निचर वगैरेची खरेदी ई.

खर्च वजा करा

फ्रीलान्स सेवा देण्यासाठी ग्राहकांचा शोध घेताना तुम्हाला अनेक खर्च आले असतील. जसे उदा. इंटरनेट फी, भाडे, प्रवास खर्च, आदरातिथ्य आणि मनोरंजन खर्च, घसारा, देखभाल, सदस्यता शुल्क, कार्यालयीन फर्निचर खर्च आणि इतर युटीलिटी (उपयोगिता) बिले ई.

तुम्‍ही फ्रीलान्सिंगची कामे मिळविण्यासाठी इतरांची मदतही घेतली असेल. तुमच्या खर्चाची गणना करताना यासाठी केलेल्या खर्चाचाही विचार करावा.

दिलेल्या मूल्यांकन वर्षासाठी तुमचे निव्वळ करपात्र उत्पन्न काढताना तुम्ही हे सर्व खर्च, तुमच्या एकूण उत्पन्नातून, फ्रीलांसिंग उत्पन्नाशी थेट संबंधित खर्च म्हणून वजा करा.

काही खर्च वजा केले जाऊ शकतात:

●   तुम्ही तुमचे काम करण्यासाठी जर कोणती मालमत्ता भाड्याने घेतली असेल तर त्यासाठी भरलेले भाडे वजा केले जाऊ शकते.

●   जर तुम्ही भाड्याने घेतलेल्या मालमत्तेची दुरुस्ती केली तर त्या दुरुस्तीचा खर्च वजा केला जाऊ शकतो.

●   जर व्यवसाय मालमत्ता तुमची स्वत:ची असेल व तेथे दुरुस्ती केली तर तो खर्च तुम्ही वजा करू शकता.

●   तुमच्या लॅपटॉप, प्रिंटर किंवा इतर उपकरणांची दुरुस्ती देखील वजावटीसाठी पात्र असते.

●   तुमच्या कामाच्या दरम्यान झालेला खर्च, जसे की प्रिंटर खरेदी, कार्यालयीन पुरवठा, मासिक फोन बिल, इंटरनेट बिले आणि वाहतूक खर्च, हे सर्व वजा केले जाऊ शकतात.

●   भारतातील किंवा बाहेरील ग्राहकांना भेटण्यासाठी केलेला प्रवास खर्च वजा केला जाऊ शकतो.

●   जेवण, मनोरंजन किंवा आदरातिथ्य यासाठी केलेला खर्च.

●   जेव्हा तुम्ही ग्राहकाची भेट घेता, त्यांना जेवायला घेऊन जाता किंवा नवीन व्यवसाय मिळवण्याच्या किंवा चालू व्यवसाय टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने इतर प्रवासाला जाता तेव्हा त्या खर्चाचा दावा केला जाऊ शकतो.

●   तुमच्या परिसरातील तुमच्या स्वतःच्या कंपनीच्या मालमत्तेसाठी कर आणि विमा.

●   डोमेनची नोंदणी आणि तुमच्या उत्पादनाची चाचणी घेण्यासाठी सॉफ्टवेअर खरेदी करणे हे देखील स्वीकार्य खर्च आहेत.

TDS (टॅक्स डीडक्टेड ॲट सोर्स) (ॲडजेस्टमेंट)/समायोजन

तुम्ही ज्या ग्राहकांसाठी फ्रीलान्स काम करता त्यांच्या एकूण पेमेंटमधून 10% कर वजा करा. (हा कर इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 194J नुसार TDS (टॅक्स डीडक्टेड ॲट सोर्स) म्हणजेच उत्पन्नाच्या स्त्रोताकडून वजा केला जाणारा कर असेल.)

तुमच्या टॅक्स ब्रॅकेटनुसार तुम्ही इन्कम टॅक्स विभागाकडून परतावा मिळण्यासाठी पात्र ठरू शकता. याशिवाय, जर तुम्ही तुमच्या फ्रीलान्स कामात तुम्हाला मदत करण्यासाठी एखाद्याला कामावर घेतल्यास, त्यांच्या पैशातून 10% कर वजा करून त्यांना पेमेंट करा. जेव्हा तुम्ही तुमचा रिटर्न फाईल कराल, तेव्हा तुम्ही ही रक्कम TDS म्हणून वजा करून घ्या.

जीएसटी (GST)

जर तुमचे वर्षभराचे एकूण उत्पन्न INR 20 लाखांपर्यंत पोहोचले तर, तुम्ही GST साठी रजिस्टर/नोंदणी करणे आवश्यक आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न INR 20,000 पेक्षा कमी असल्यास, तुम्हाला GST मधून सूट मिळेल.

जर तुम्ही GST रजिस्स्ट्रेशनसाठी पात्र असाल किंवा तुमच्याकडे GST क्रमांक आधीपासून असेल तर तुम्ही तुमच्या ग्राहकाला GST आकारणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या फ्रीलान्स सेवा देता त्या सेवेनुसार GST दर बदलतो, परंतु GST मध्ये समाविष्ट असलेल्या बहुतांश सेवांवर 18% कर असतो.

आगाऊ कर (ॲडव्हान्स टॅक्स)

जर दिलेल्या आर्थिक वर्षासाठी तुमचे कर दायित्व INR 10,000 पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला फ्रीलान्सर म्हणून तिमाही (क़्वार्टरली) कर भरावा लागतो.

हा कर वेळेच्या आधी भरला जात असल्याने त्याला ‘आगाऊ कर’(अ‍ॅडव्हान्स टॅक्स) असे म्हणतात. या व्यवस्थेअंतर्गत प्रत्येक तिमाही संपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कराची किमान ठराविक रक्कम (किमान परिभाषित प्रमाण) भरणे आवश्यक आहे.

इन्कम टॅक्स विभागाच्या चलन 280 चा वापर करून आगाऊ कर भरता येतो. हा कर भरल्यानंतर तुम्हाला त्याची एक पावती दिली जाते.

ही पावती व्यवस्थित ठेवणे गरजेचे असते कारण तुमचा ITR/ इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्हाला त्या पावतीची गरज भासेल. जर तुम्‍ही आगाऊ कर देण्यास पात्र असाल, परंतु तुम्ही कलम 234B आणि 234C अंतर्गत तो न भरण्‍याचे निवडल्‍यास, तुम्‍हाला दंड आकारला जाईल.

मी माझा इन्कम टॅक्स रिटर्न कधी भरावे?

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे (प्रत्येक आर्थिक वर्ष संपताना  ज्यासाठी तो भरणे आवश्यक आहे). ही मुदत वाढवण्याचा अधिकार इन्कम टॅक्स विभागाकडे असतो.

जर तुमची अंतिम मुदत चुकली असेल किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर तुम्ही टॅक्स रिटर्न भरू इच्छित असाल तर?

जरी तुमची अंतिम मुदत चुकली तरीही तुम्ही उशीरा/विलंबित रिटर्न भरू शकता. संबंधित मूल्यांकन वर्षाच्या तीन महिन्यांपूर्वी, लेट इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात उशिरा भरला जाणारा रिटर्न दाखल केला जाऊ शकतो.

2020-21 या आर्थिक वर्षासाठी तुमचा ITR/इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तुमच्याकडे 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत आहे, जी 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

आता तुम्हाला ITR/इन्कम टॅक्स रिटर्न कसा आणि केव्हा भरायचा हे माहिती आहे, तुम्ही दरवर्षी अंतिम मुदतीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे याची जरूर खात्री करून घ्या.

(तुम्हाला कायद्याच्या विरुद्ध बाजूने उडी मारायची नाही, बरोबर?) त्यामुळे तुमच्या इन्कम टॅक्स फाइल्स अधिक अचूक आणि परिपूर्ण बनवण्यास सुरुवात करा.

फ्रीलान्सर म्हणून, अकाउंट बुक आणि प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा. योग्य फॉर्मची निवड करा.

अचूक पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न भरा; आणि जर काही मदत हवी असेल तर त्यासाठी तज्ञ व्यक्तीला संपर्क साधताना संकोच बाळगू नका.

 

 

Team Jar

Author

Team Jar

ChangeJar is a platform that helps you save money and invest in gold.

download-nudge

Save Money In Digital Gold

Join 4 Cr+ Indians on Jar, India’s Most Trusted Savings App.

Download App Now