डिजिटल गोल्डबद्दल 9 सामान्य गैरसमज – जार ॲप

Author Team Jar
Date Apr 21, 2023
Read Time Calculating...
डिजिटल गोल्डबद्दल 9 सामान्य गैरसमज – जार ॲप

जगात सोन्याविषयीचं वेड कधीच कमी होणार नाही आणि भारतात तर नाहीच नाही, मात्र दागदागिन्यांमध्ये गुंतवणुक करण्यासोबतच आता सोने खरेदी करण्याचा एक नवीन मार्ग डिजिटल गोल्डच्या रूपात समोर आलं आहे.  तुम्हीही सोने विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा एक सुरक्षित, सर्वात सोयीस्कर आणि किफायतशीर पर्याय नक्की लक्षात घ्या.

 भारतातील तीन सुवर्ण बँक पैकी एक म्हणजेच  - Augmont, MMTC - PAMP & SafeGold - तुम्ही खरेदी करता त्या प्रत्येक ग्रॅम सोन्यासाठी सुरक्षित ठेवले जाते

‍अ‍ॅपमध्ये एका क्लिकवर, तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता, विक्री करू शकता किंवा प्रत्यक्ष सोने तुमच्या घरी पोहोचवण्याची विनंती करू शकता.

मुख्य काय तर,  डिजिटल सोन्यासाठी किमान खरेदी आवश्यक नाही. तुम्ही 1 रुपयांपासून सुरुवात करू शकता. आता प्रत्येकजण सोने खरेदी करू शकतो.

भारतात सध्या ही संकल्पना नवीन असल्याने, डिजिटल गोल्डबद्दल अनेक गैरसमज आणि शंका आहेत.

तुम्हाला चांगले निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी या सर्व गैरसमजांना सोडवून घेऊया.. 

1. सोने ही एक महाग वस्तू आहे. सोन्यात बचत करण्यासाठी तुम्हाला श्रीमंत असणे आवश्यक आहे.

सत्य: नाही! जार ॲप वापरून डिजिटल गोल्ड 1 रुपया इतक्या कमी किमतीत खरेदी करता येते. 

बरेच लोक सोन्याला प्रतिष्ठेचं प्रतीक मानतात, असं असलं तरी आपण या डिजिटल गोल्डमध्ये अगदी किमान असे कितीही पैसे गुंतवू शकता.

सोने कमी किमतीत मिळू शकते आणि ही किफायतशीर गुंतवणूक आहे. एकेकाळी फक्त श्रीमंतांसाठी राखीव मानला जावा असा मौल्यवान धातू आता प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. ‍

2. ऑनलाइन सोने हे शुद्ध सोने नाही.

सत्य: जार वर, डिजिटल सोन्याला 99.5% म्हणजेच 24 कॅरेट शुद्धतेची गॅरंटी आहे. जेव्हा तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करता, तेव्हा तुम्ही ऑगमॉन्ट गोल्ड लिमिटेड, सेफगोल्ड आणि MMTC-PAMP India Pvt. सारख्या नामांकित कंपन्यांकडून ते सोने खरेदी करता. त्यामुळे ते खरे, सुरक्षित आणि शुद्ध आहे यात शंका नसावी. 

3. सोन्याची गुंतवणूक खूप जोखमीची आहे.

सत्य: प्रत्येक गुंतवणुकीत काही जोखीम असते आणि त्याचे स्वतःचे फायदे आणि तोटे असतात. सोन्याच्या बाबतीतही तेच आहे. सोन्यात, प्रत्यक्षात, स्टॉक आणि इक्विटी यांसारख्या अत्यंत अस्थिर गुंतवणुकीपेक्षा कमी जोखीम घटक आहे.

सोने ही एक उत्तम गुंतवणूक आहे कारण ते एक मौल्यवान नैसर्गिक संसाधन आहे जी नेहमी मागणीत असते. महागाई आणि धोकादायक गुंतवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.‍

4. डिजिटल गोल्ड हे मालकीचे केवळ कागदी प्रमाणपत्र आहे.

सत्य: ते खरे नाही. डिजिटल गोल्ड हे सुद्धा तुमच्या मालकीचे सोने आहे. प्रत्येक सोन्याची खरेदी रक्कम कितीही असली तरी ती सुरक्षित आणि विमा असलेल्या तिजोरीत ठेवली जाते. ग्राहक कोणत्याही क्षणी आपल्या तिजोरीतील रक्कमेचे सोने प्रत्यक्ष सुद्धा मिळवू शकतात. 

5. सोन्यातून व्याज कमी आहे

सत्य: सत्य अगदी उलट आहे. सुनियोजित सोन्याच्या गुंतवणुकीमुळे चांगले पैसे मिळू शकतात. 

सोने खरेदी करणे हे खरे पैसे हाती ठेवण्यासारखेच आहे, जे धोकादायक स्टॉक खरेदीच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे. सोने तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ संतुलित करण्यास, महागाईतुन वाचवणारे दीर्घकालीन परतावा देऊ शकते. 

वस्तूंच्या विक्रीनंतर दीर्घकालीन भांडवली नफ्यावर (जरी ते फक्त तीन वर्षांचे असले तरीही) अतिरिक्त लाभांसह 20% कर आकारला जातो.

गेल्या 92 वर्षांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचे मूळ मूल्य आहे आणि ती भारतातील एक उत्तम मालमत्ता आहे, वर्षभरात आणखी मजबूत परताव्यासह तुम्हीही तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम व्याज मिळवू शकता. हिरे किंवा प्लॅटिनमच्या तुलनेत सोन्याकडे परंपरेने एक ठोस गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिले जाते. ‍

6. सोने खरेदी करणे क्लिष्ट आहे आणि त्यासाठी भरपूर कागदपत्रे लागतात.

सत्य: डिजिटल गोल्ड हे खूप सोपे आणि सोयीस्कर आहे.  फोन, इंटरनेट, आणि बँक खाते किंवा UPI या इतक्याच गोष्टींच्या आधारे आपण डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. 

तुम्ही जार ॲपवर KYC शिवाय 30 ग्रॅम पर्यंत डिजिटल सोने खरेदी करू शकता.

हे इतर काहीही ऑनलाइन खरेदी करण्यासारखे आहे. जेव्हा व्यवहार 2 लाख रु. पेक्षा जास्त असेल तेव्हाच पॅन कार्डची माहिती आवश्यक असते. 

7. डिजिटल गोल्ड हे भौतिक सोन्यासारखे नसते.

सत्य: होय, ते खरं आहे! तुमच्याकडे  0.5 ग्रॅमपर्यंत सोने असल्यास तुम्ही प्रत्यक्ष सोन्यात (नाणी किंवा दागिने) स्वरूपात हे सोने रूपांतरित करू शकता.

जर ॲप वापरून, तुम्ही तुमचे पैसे काढू शकता किंवा भौतिक सोन्यात रूपांतरित करू शकता आणि ते कधीही तुमच्या घरी डिलिव्हर केले जाईल 

खरं तर, हे भौतिक सोन्यापेक्षा चांगले आहे जे तुम्ही तुमच्या खर्चाच्या क्षमतेनुसार प्राप्त करू शकता.

तुम्ही महागडे दागिने किंवा नाणी घेण्यासाठी एकाच वेळी पूर्ण बँक खाते रिक्त करण्यापेक्षा थोडे थोडे करून तुमचे सोने गोल्ड बँकच्या तिजोरीत साठवू शकता, या डिजिटल गोल्डला चोरीचा धोका नाही कारण या तिजोरी पूर्णतः विम्याद्वारे सुरक्षित आहेत. 

8. दीर्घकालीन परतावा इक्विटीमध्ये सर्वोत्तम असतो.

सत्य: हे नेहमीच खरे नसते. जर तुम्ही गेल्या पाच आणि दहा वर्षांतील डेटा तपासून पाहिलात, तर तुमच्या लक्षात येईल की सोने गुंतवणुकीतील परतावा नियमितपणे इक्विटीच्या तुलनेत जास्त आहे.

प्रत्यक्षात, सोन्यामध्ये बचत केल्याने स्टॉक मार्केटमधील अस्थिर बदलांपासून तुमचे संरक्षण होते.

9. अतिरिक्त छुपे शुल्क आणि उच्च स्टोरेज किमती

सत्य: जार पारदर्शकतेवर दृढ विश्वास ठेवणारा आहे. जेव्हा तुम्ही जर ॲप वापरून गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही फक्त 24 कॅरेट असलेल्या शुद्ध सोन्याचा व्यापार करता.

तुम्ही खर्च केलेली सर्व रक्कम सोन्यात गुंतवली जाते. खरेदीच्या वेळी तुमच्याकडून फक्त 3% GST आकारला जाईल.

कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा स्टोरेज शुल्क नाही. सर्व डिजिटल सोने उच्च-सुरक्षा तिजोरीत विनामूल्य संग्रहित केले जाते आणि पूर्णपणे विमा उतरविला जातो.

डिजिटल गोल्डबद्दल सविस्तर माहिती येथे वाचा. डिजिटल गोल्ड भौतिक सोन्यापेक्षा चांगले कसे आहे ते याविषयी जाणून घ्या. 

आता इतकं सगळं स्पष्ट असताना डिजिटल गोल्ड वापरून पाहण्यासारखे आहे हे तुम्ही मान्य करत नाही का? ही संधी तुमच्या हातून जाऊ देऊ नका. यासाठी फक्त 45 सेकंद आणि किमान 1 रुपया लागतो.

जार हे केवळ डिजिटल गुंतवणूक ॲपपेक्षा अधिक आहे. हे एक स्वयंचलित गुंतवणूक साधन देखील आहे जे तुम्हाला पैसे वाचविण्यास प्रोत्साहन व सोपा मार्ग पुरवते. तुमची बचत वाढवा.

जार ॲपसह लगेचच डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा !

Team Jar

Author

Team Jar

ChangeJar is a platform that helps you save money and invest in gold.

download-nudge

Save Money In Digital Gold

Join 4 Cr+ Indians on Jar, India’s Most Trusted Savings App.

Download App Now