Buy Gold
Sell Gold
Daily Savings
Digital Gold
Instant Loan
Round-Off
Nek Jewellery
हा आहे बचतीचा सोपा राजमार्ग! जार ॲपच्या साथीने दररोज बचत करायला सुरूवात करा. याशिवाय रोज मिळवा तुमची बचत दुप्पट करण्याची सुवर्णसंधी!
जार हे एक दररोज सोन्याच्या माध्यमातून बचत करण्यासाठीचे ॲप आहे. त्यामुळे आता बचत करण्याची सवय होते सहजसोपी आणि गमतीचीही! आता जेव्हा जेव्हा तुम्ही ऑनलाईन खरेदी कराल तेव्हा तेव्हा थोडीशी बचतही करा.
जार ॲप म्हणजे तुमची डिजिटल पिगी बँकच आहे म्हणा ना. तुमच्या मोबाइल फोनवरील एसएमएस फोल्डरमधून ते तुमच्या खर्चाचा मागोवा घेते आणि तुमच्या प्रत्येक खर्चाची रक्कम जवळच्या दहाच्या पटीतील संख्येपर्यंत राऊंड ऑफ करते. उदाहरणार्थ तुम्ही ऑनलाइन 98 रुपयांचे मोबाइल रिचार्ज केले तर तुमच्या मोबाईलमधील रिचार्ज कन्फर्मेशन मेसेज हेरुन जार ही रक्कम जवळच्या 10 ला म्हणजेच 100 ला राऊंड ऑफ करेल. दोन्हीमधला 2 रुपयांचा (100-98 ) फरक तुमच्या बँक खात्यातून (तुमच्या यूपीआय आयडीशी संलग्न) घेऊन ऑटोमॅटिकली डिजिटल गोल्डमध्ये गुंतवेल.
तुमची ही किरकोळ बचत जार ॲप थेट 99.9% शुद्ध सोन्यात गुंतवते. हे सोने जागतिक दर्जाच्या तिजोऱ्यांमध्ये सुरक्षित ठेवले जाते आणि भारतातील आघाडीच्या बँकांद्वारे इन्शुअर केलेले असते.
यूपीआय ऑटोपे वापरुन लक्षावधी भारतीयांची बचत आणि गुंतवणूक ऑटोमेट करणारे जार हे भारतातील पहिले आणि एकमेव ॲप आहे. एनपीसीआय आणि भारतातील मोठ्या यूपीआय सेवांच्या आशीर्वादाने जार ॲपने सूक्ष्म बचतीसाठी पूर्ण ऑटोमॅटिक पर्याय दिला आहे आणि असंख्य भारतीयांसाठी गुंतवणुकीचे लोकशाहीकरण केले आहे.
● तुम्ही फक्त 45 सेकंदांच्या आत जार ॲप खाते उघडू शकता. ही एक कागदपत्रविरहित प्रक्रिया आहे. जार ॲपवर बचत करणे सुरू करण्यासाठी केवायसीची गरज नसते.
● तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही तुमचे सोने विकू शकता आणि घरबसल्या तुमच्या बँक खत्यातून तुमचे पैसे काढू शकता. यात कोणताही किमान लॉक-इन् कालावधी नाही.
● तुम्ही विनामूल्य गेम खेळून तुमची बचत दुप्पट करण्याची सुवर्णसंधी साधू शकता.
● जार ॲप तुमची बचत ऑटोमेट करते आणि तुम्हाला दररोज बचत करण्याची सवय लावते.
● सेबी मान्यताप्राप्त बँकेत खाते असलेला कोणताही भारतीय जारद्वारे गुंतवणूक करू शकतो.
● प्रत्यक्ष सोने आपल्याकडे असले तर ते चोरीला जाण्याची भीती असते. तसेच त्यासाठी महागडे लॉकर भाडे भरावे लागते. मात्र जार ॲपद्वारे तुमचे सोने कोणतेही शुल्क न भरता जागतिक दर्जाच्या, बँकेसारख्याच लॉकर्समध्ये अतिशय सुरक्षितरित्या ठेवले जाते.
जार ॲपने जुन्या-पुराण्या पिग्मी डिपॉझिट स्कीमचेही डिजिटायझेशन केले आहे. त्यामुळे आता बँकेत खाते असलेला प्रत्येक भारतीय रोज केवळ 1 रुपयापासून चालू होणारी ठराविक रक्कम साठवून तिची सोन्यामध्ये ऑटोमॅटिक गुंतवणूक करण्याची संधी देते.